pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाचे सोमवार रोजी ध्वजारोहनाचा कार्यक्रम

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.30

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी गौरव समितीच्या वतीने  दि. 1 मे ते 17 सप्टेंबर 2023 पर्यंत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून जालना जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 1 मे सोमवार महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी 7.45 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते आर. आर. खडके यांच्या सिंगलजीन येथील कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे आणि टाऊनहॉल जुना जालना येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गौरव समितीचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, माजी प्रदेश सचिव आर. आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, विजय चौधरी, गणेश राऊत आदींनी केली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4