pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून भानेगाव शाळेचा कायापालट

सांस्कृतिक मंचासह विविध उपक्रम

0 1 7 4 1 1

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.23

शासन शिक्षणावर विविध योजनेसह शिक्षकावर लाखो रुपये खर्च करीत आहे.त्यामध्ये काही शिक्षक आपला वशिला खर्च करून आपल्या सोयीनुसार ठिकाण शोधुन आपापल्या परीनुसार काम करत असतात. तर काही शिक्षक आपण कर्तव्य पार पाडत आहोत त्याठिकाणी काहीतरी कायापालट केलाच पाहिजे या हेतुने काम करत तेथील शैक्षणिक सुविधेसह ईतर बदलाव निर्माण करतात. हदगांव तालुक्यातील विदर्भ हद्दीलगत असलेल्या भानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठ महिन्यांपुर्वीच पदभार स्वीकारलेले मुख्याध्यापक एस.एन.मोरे यांनी पदरमोडासह शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन शाळेत सांस्कृतिक मंच विविध उपक्रम राबवित शाळेचा कायापालट केला.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव येथे सातवीपर्यंत शाळा आहे.विद्यार्थी संख्या 89 आहे.शिक्षकाची चार पदे आहेत. मुख्याध्यापक एस.एन.मोरे यांनी स्वखर्चातून जवळपास 35 हजार रुपये खर्च करून शालेय सांस्कृतिक मंच ची उभारणी केली .यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर दत्ता डोके , उपाध्यक्ष बालाजी रणवीर जनार्दन वच्चेवार , मारोतराव हुलकाने यांच्यासह शालेय शिक्षण समिती शाळेतील शिक्षीका डी. एल. कोठेकर शिक्षक पी.टी. कांबळे ,शिक्षक डी.व्ही. पवळे यांच्या सहकार्य लाभले .
शाळेत पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने शाळेत परसबाग असून परीसरात हिरवीगार झाडे आहेत. शाळेत शिक्षकांनी नेहमी विविध कार्यक्रमातुन भक्ती गीते , प्रार्थना, नृत्य , गोंधळ ,देशभक्तीपर गीते , नाटक, एकांकिका , प्रबोधनात्मक शेतकरी राजा नाटीका अशा विविध सांस्कृतिक कलाकृती सादर करून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवले. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो हे विशेष आहे. शालेय विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक विकासासह शाळेतील विविध उपक्रम व कायापालटाने शाळा आकर्षण ठरत असुन गावक-यामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक एकाविचाराने कौतुकास्पद काम करतात. शाळा डिजीटल करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत गावकरी मंडळीकडुन लोकसहभागातून काम करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
शंकर डोके अध्यक्ष शालेय शिक्षण समिती.

शाळेतील विकासासाठी आमच्याकडुन नेहमीच विविध योजनेतुन प्राधान्य दिले आले असून नव्यानेच केलेल्या सांस्कृतिक मंचाच्या शेडसह विविध विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वित्त आयोगातुन निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
सिमा सुदर्शन आढाव सरपंच भानेगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे