pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा व बक्षिस समारंभ

0 1 7 4 0 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शेवा स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण यांच्यावतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा तसेच स्कॉलरशिप मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि 10 वी ,12वी च्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठया उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इर्शाळ वाडीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.ह्यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उपजिल्हा संघटक ममता पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, तालुका संघटक सुजाता गायकवाड, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, उपतालुका संघटक मनिषा ठाकूर, नितीन ठाकूर, प्राचार्य नविन शेवे संतोष म्हात्रे उपस्थित होते.

शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष वाय.एस.पाटील यांनी प्रास्ताविक करताना शिक्षक सेनेची स्थापना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी जपन्यासाठी करण्यात आली असून संघटना करीत असलेले कार्य विशद केले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त शिक्षक अंकुश पाटील,गोपाळ घरत, मनोहर वर्तक,केशव गावंड,यशवंत पाटील, निलवंती घरत,कांचना किल्लेकर यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर स्कॉलरशिप मिळवलेल्या,तसेच 10 वी ,12 वी मध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.तसेच पेण व उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीवर संचालकपदी निवडून आलेल्या हितेंद्र म्हात्रे,रविंद्र पाटील, रमणिक म्हात्रे व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या संजय होळकर आणि रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर ,तालुका प्रमुख संतोष ठाकूर ,जिल्हा उपसंघटिका ममता पाटील यांनी सत्कार प्राप्त सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांच्या कार्याचा उल्लेख करून यापुढेही सेवानिवृत्ती नंतर सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.त्याचप्रमाणे सर्व गुणी सत्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून असेच उज्ज्वल यश यापुढेही मिळवून स्वतःचे आईवडिलांचे नाव मोठे करावे. तसेच एक सुजाण नागरीक घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शिक्षक सेनेच्या विविध स्तरावर सामाजिक कार्याबद्द्ल समाधान व्यक्त करून सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले.
शिक्षक सेना उरणचे वाय.एस.पाटील,राजेंद्र पाटील,वासुदेव म्हात्रे, महेश गावंड,हितेंद्र म्हात्रे, राजेश चोगले,गोपाळ घरत, जी.आर.म्हात्रे, जितेंद्र ठाकूर,संजय होळकर, राजकिरण डुंगीकर,रितेश मोकल,गणेशप्रसाद गावंड, संदिप गावंड,रमेश घरत, अनिल म्हात्रे, बंडू गायकवाड, छाया गावंड,रूपाली पाटील,सुजाता पाटील, पुनम पाटील, मानसी म्हात्रे आदी शिक्षक सेना सदस्य-सदस्या उपस्थित होत्या. तसेच रमणिक म्हात्रे, बळीराम पाटील, अजित जोशी, भ.तू.पाटील, रमेश पाटील आणि सर्व सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षिका, सर्व यश संपादन केलेले विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गावंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय होळकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे