जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

गेवराई/ प्रतिनिधी,दि.25
गेवराई शहरातील गेल्या 52 वर्षाची परंपरा असलेल्या मेन रोड येथील जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक 24 वार रविवार रोजी महाप्रसाद व रक्तदान शिबिर व आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले . या रक्तदान शिबिरामध्ये 130 युवकांनी रक्तदान केले.
गेवराई शहरातील मेन रोड भागांमध्ये असलेल्या जगदंबा गणेश मंडळाचे यावर्षी 53 नावे वर्षे होते गेल्या 52 वर्षाची परंपरा असल्यामुळे प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी जगदंबा गणेश मंडळाची महा आरती गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते
करण्यात आली व त्यानंतर उद्घाटन करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये गेवराई शहरातील व्यापारी बांधवांनी तसेच सर्व स्तरावरील नागरिकांनी रक्तदान करून
महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी 130 जनांनी रक्तदान केले.महाप्रसाद व रक्तदान शिबिरासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.