pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला; सकल धनगर रस्त्यावर उतरणार

0 1 1 8 2 2

पाटोदा/ नितिन भोंडवे,दि.11

धनगर समाज आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे चित्र दिसून येत आहे कारण येत्या 17 सप्टेंबरला सकल धनगर समाज च्या वतीने बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आव्हान सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. धनगर समाजासाठी लागू केलेल्या आदिवासी योजनाची ही अंमलबजावणी झाली नाही आरक्षणाचा मुद्दा ही हाती घेतला नाही. त्यामुळे धनगर समाज हा आता पुन्हा पेटून उठणार आहे. यामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने बीड येथून पहिले ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आता सरकारने समाजाला गाजर दाखवण्याचं काम करू नये,धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट द्यावे, त्या अनुषंगाने जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावला तर धनगर समाज गप्प बसणार नाही, तो नंतर बहुसंख्येने आंदोलने,उपोषण करणार आहे असे सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. 17 सप्टेंबर रोजी बांधवांनी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles