pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा शिक्षक संघाची बीड शिक्षणाधिकारी माध्यमिक समवेत तक्रार निवारण बैठक संपन्न!

0 3 8 4 4 1

जालना/प्रतिनिधी, दि.20

मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बीड मा प्रियाराणी पाटील यांच्या समवेत तक्रार निवारण बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अनेक प्रलंबित प्रश्न बैठकीतच सोडविण्यात आले तर काही प्रश्न ठराविक कालमर्यादेत सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की, शिक्षणाधिकारी माध्यमिक स्तरावरील आणि शालेय स्तरावरील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मराठवाडा शिक्षक संघाने मा शिक्षणाधिकारी माध्यमिक समवेत तक्रार निवारण बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, मार्गदर्शक डी.जी. तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे, केंद्र कार्यकारिणी सदस्य अशोक मसकले, बंडू आघाव, विनोद सवासे यांनी संघटनेच्या वतीने भागिदारी केली तर मा प्रियाराणी पाटील, अजय बहीर, अधीक्षक(माध्यमिक), राजेश खटावकर अधिक्षक वेतन व भनिनि पथक, नानाभाऊ हजारे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक,जेष्ठ लिपिक श्री तावडे शिक्षणाधिकारी माध्यमिकच्य वतीने बैठकीत भागिदारी केली. बारा व चोवीस वर्षाच्या अर्हताकारी सेवे नंतर देय्य प्रलंबित वरिष्ठ व निवड प्रकरणे निकाली काढण्या बाबत तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित फरकाचे हप्त्यां बाबत उचित कार्यवाही करणे, प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तातडीने जमा करण्याचे आदेश निर्गमित करण्या बाबत निर्णय घेण्यात आले. निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, वैद्यकीय प्रतिपूरत्ती देयकाका बाबतची अनेक वैयक्तिक प्रकरणे बैठकीतच निकाली काढण्यात आली. याप्रसंगी संघटनेच्या वतीने शिक्षण; प्रश्न अनेक-ऊत्तर एक ज्ञानोबा वरवट्टे गौरव ग्रंथ मान्यवरांना भेट देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे