आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड शा .चिलपिपरी ता.मुदखेड येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची उद्या सांगता
कार्यक्रमाला परिसरातील भाविक सहभागी व्हा असे चिलपिपरी गावकऱ्यांच्या वतीने आवाहन

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.20
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून संपूर्ण नांदेडसह महाराष्ट्रभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आगळा वेगळा उपक्रम हभप राम महाराज पांगरेकर व त्यांच्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे.या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांनी हे पारायण आपल्याच घरी बसून आपल्या सोयीच्या वेळेनुसार करावयाचे आहे. पारायणामध्ये लहान, थोर,वृद्ध,स्त्री,पुरुष,बालक सुद्धा सहभागी झालेले आहेत पारायण सर्वांनाच करता यावे त्यांना त्याच्या वेळेनुसार सहभागी होता यावे म्हणुन आम्ही वारकरी परिवाराने “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद उराशी बाळगून हा उपक्रम सुरू केला.
त्याप्रमाणे मुदखेड तालुक्यातील चिलपिपरी या गावातील सदभक्तानी गेल्या आठ वर्षांपासून गावातील शेकडो भक्तांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या सोयीनुसार छतिस दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करून दररोज आपल्याला समजलेल्या ओविचे चिंतन गुपमध्ये पाठविले तसेच दर वर्षि प्रमाणे याहि वर्षि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता अनेक संत,व मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत संस्थेचे मार्गदर्शक हभप रावसाहेब पा.शिराळे, मार्गदर्शक मा.दतराम पा.येडके,संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर, सचिव हभप व्यंकटराव जाधव माळकौठेकर, सहसचिव हभप प्रभाकर महाराज पुयड, प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल सल्लागार शिवाजीराव पांगरेकर,
भगवान पाटिल राहाटिकर, हरीनाम पा.कदम,मारोतराव वडजे, इत्यादी मान्यवर , भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या.सोहळ्यात अनेक संत महात्मे यांचे आर्शिवाद रूपी प्रवचन , सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण,आरती,महाप्रदाने कार्यक्रमाची सांगता होनार आहे तरी साधक, भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान सुभाष गाडे,आनंदा गाडे, दत्तराम गाडे,विलास गाडे, बालाजी गाडे, शंकर गाडे, रावसाहेब गाडे,दशरथ गाडे, गोपीनाथ गाडे,पुंडलिक गाडे, मारुती गाडे,अंकुश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, माधवराव गाडे, नागोराव गाडे,संभाजी गाडे, शिवाजी गाडे गोविंद गाडे, हनुमंत गाडे,मोहन गाडे बालाजी गाडे संजय कोलते पत्रकार इत्यादी गावकऱ्यांनी केलीअशी माहिती आम्ही वारकरी परिवाराकडून देण्यात आलेली आहे.आम्ही वारकरी परिवाराच्या या उपक्रमाचे जिल्हा भर कौतुक होत आहे. असे प्रसिध्दीपत्रक प्रसिद्धीप्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी दिले



