ब्रेकिंग
बाजार वाहेगाव येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान जनजागृती मोहीम

0
3
2
1
7
2
बदनापूर/प्रतिनिधी, दि.8
आज (दि.8) वार बुधवार रोजी बाजार वाहेगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढीव करण्याच्या दृष्टिकोनातून (SVEEP) अंतर्गत मा. गटशिक्षणाधिकारी श्री. भालेराव साहेब यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी गट समन्वयक श्री जुंबड सर श्री विकास पोथरे सर ,श्री पाटील सर , श्री साबळे सर केंद्रप्रमुख बदनापूर, श्री. युवराज भालेराव केंद्रप्रमुख बाजार वाहेगाव, श्री.गिरशेट्टी सर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील निर्मल मॅडम तसेच बाजार वाहेगाव शाळेतील सर्व शिक्षक गावातील अंगणवाडी सेविका व गावातील मतदार उपस्थित होते.
0
3
2
1
7
2