प्रा. पी.बी. देसाई यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न.

हिंगोली/प्रतिनिधी, दि.2
सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दिनांक 31 ऑगस्ट 2024 शनिवार रोजी वाणिज्य विभागात 29 वर्षापासून कार्यरत असणारे प्रा प्रभाकर बाळाभाऊ देसाई नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले याप्रसंगी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने ‘उत्सव स्नेहाचा…. सोहळा सेवापूर्तीचा’ या अनुषंगाने सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर एस जी तळणीकर प्रमुख उपस्थितीत विभाग प्रमुख डॉ एस एस अग्रवाल सिनेट सदस्य आर् एम शेळके डॉ राजेश जोशी उत्सव मूर्ती प्रा देसाई व सौ देसाई आदी मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजेश जोशी यांनी करत 29 वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला प्रा डॉ एस एस अग्रवाल, डॉ प्रवीण तोतला डॉ एस आर पजई ,प्रा यू पी सुपारी प्रा संजय फड प्रा कैलास आसेगावकर, डॉ डी जी सावंत, डॉ जी पी भालेराव डॉ शितल देसाई अजगर यांनी प्रासंगिक भावना मांडल्या प्रा देसाई यांनी उर्वरित आयुष्य समाज कार्यासाठी खर्च करण्याचे जाहीर केले. अध्यक्ष समारोप प्रसंगी डॉ तळणीकर यांनी प्रा देसाई यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे व कुटुंबीयांना अधिकाधिक वेळ देण्याचा सल्ला दिला. महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने उभयतांना कपडे व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.