महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – कुंदा ठाकूर

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे. प्रत्येक महिलांनी स्वावलंबी जीवन जगून आपला कुटुंब, आपला देश पुढे न्यावा. शासनातर्फे महिलांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना मोठया प्रमाणात असून समाजातील गरजू, वंचित घटकांनी याचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई ठाकूर यांनी केले.
उरण तालुक्यातील पाणजे येथे नवतरुण मित्र मंडळ पाणजे तर्फे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट )उरण तालूकाध्यक्ष कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी उपस्थित महिला बचत गटांना व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, पाणजे ग्रामपंचायतचे सरपंच लखपती पाटील, उपसरपंच विलास पाटील,माजी उपसरपंच अविनाश पाटील, शिवभक्त हेमदास गोवारी (उरण ), महिला बचत गटाचे प्रमुख रत्ना पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कुंदाताई ठाकूर यांनी महाशिवरात्री निमित्त भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले.याचवेळी जागतिक महिला दिनाचे औचित्या साधून पाणजे गावातील सर्व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. कुंदाताई ठाकूर यांच्या हस्ते बचत गटांना सन्मानित करण्यात आले.महिला मुलींसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री, जिजाऊ वसतिगृह, महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना याबाबत कुंदा ठाकूर यांनी माहिती दिली. बँकेतून कर्ज कशा प्रकारे काढावे ? व्यवसाय कसा करावा याविषयी कुंदाताई ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्व महिला बचत गटाना भविष्यात कोणतेही मदत लागल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन कुंदाताई यांनी यावेळी दिला.
आपले मनोगत व्यक्त करताना कुंदाताई ठाकूर म्हणाल्या की नवतरुण मित्र मंडळ पाणजे या सामाजिक संस्थेला ३९ वर्षे पूर्ण झाले असून संस्था ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे. हि संस्था सतत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते आणि सातत्याने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते.त्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड ,रक्तदान शिबिर ,विविध रोग चिकित्सा शिबिर, नेत्र बिंदू चिकित्सा आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करत असते.त्याशिवाय आपल्या विभागातील व गावातील विविध कौशल्य विद्यार्थ्यांचे गुणगौरव सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, महिलांचा सन्मान असे कार्यक्रम देखील आयोजित करत असते असे सांगत कुंदाताई ठाकूर यांनी नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या कार्याचे व विविध उपक्रमांचे कौतुक केले.महिलांच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आदींनी विशेष पुढाकार घ्यावा व महिलांना स्वावलंबी बनवावे असे आवाहन कुंदाताई यांनी केले.महिला बचत गटाना विविध साहित्य मिळवून देण्यासाठी तसेच बचत गटाना नेहमी मार्गदर्शन करत असल्यामुळे सर्व महिला बचत गटा तर्फे कुंदाताई ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संजीवन म्हात्रे यांच्या याल तर हसाल या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.संजीवन म्हात्रे यांनी नवतरुण मित्र मंडळाच्या ३९ वर्षाच्या वाटचालीचा आणि कार्याचा गौरव केला.मंडळाचे कार्याध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले तर विश्वनाथ पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानले.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण मित्र मंडळ पाणजेचे अध्यक्ष दर्शन पाटील, कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील, सचिव विक्रम पाटील, सहसचिव दीपेश पाटील, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील या सर्वांनी तसेच नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.