pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय शालेय खोखो स्पर्धेत लातुर विभागाला दुहेरी मुकूट जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न

0 1 7 4 0 9
जालना/प्रतिनिधी,दि.24
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना शहरात आयोजित 14 वर्षा आतील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खोखो स्पर्धा गेल्या दोन दिवसापासुन सुरू होत्या त्यामध्ये आज मुले व मुली दोन्हा गटाचे अंतीम सामने घेण्यात आले, यात लातुर विभागातिल श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव  संघाने दोन्ही गटात विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना डॉ. पांचाळ यांनी सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडुंचा शब्द सुमनाने स्वागत करून विजयी झालेल्या खेळाडुंना, राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडुंना व पराजीत झालेल्या खेळाडुंना शुभेच्छा देवुन महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेल्या खेळाडुंना राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्याचे नावलौकीक करावे व त्याही ठिकाणी विजयश्री खेचुन आणावी अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रास्तावीक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी करून गेल्या दोन दिवसापासुन सुरू असलेल्या स्पर्धेची संपुर्ण माहिती उपस्थितांना दिली. क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे. यांनी जालना जिल्ह्यमध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व शालेय स्पर्धेपैकी सदर शालेय खोखो स्पर्धेचे अत्यंत उर्त्कष्ट आयोजन नियोजन झाल्याबाबत आपल्या मनोगतामध्ये नमुद केले. मंचावर विशेष उपस्थितीत निवृत तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, डॉ. रफिक शेख (सचिव जिल्हा खो खो असोसिएशन), दीपक सपकाळ (तांत्रिक समिती प्रमुख), निवड समिती सदस्य प्रशांत पवार, श्रीमती मनीषा मानकर, विकास सुर्यवंशी, शेख चाँद पी.जे. (जिल्हा क्रीडा संघटक तथा सचिव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन), प्र. गटशिक्षण अधिकारी डॉ. भरत वानखेडे, प्रशांत नवगीरे (क्रीडा संघटक), प्रमोद खरात (क्रीडा प्रबोधिनी प्रमुख), कु. प्रियंका येळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू), प्रकाश कुंडलकर (मुख्याध्यापक जी. प. प्रशाला मुलांची जालना), क्रीडा संघटक विजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बक्षीस वितरणामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतुन प्रथमच राज्यस्तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडुंना जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा नियोजन समीतीच्या माध्यमातुन  टि शर्ट व कॅप देण्यात आल्या तसेच विजेत्या संघातील खेळाडुंना व राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यसंघात निवड झालेल्या खेळाडुंना उत्कृष्ट अशा स्मार्ट वॉच सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. हा प्रयोग राज्यात प्रथमच झाला असुन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतुन  खेळाडुंना प्रोत्साहीत करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला.
तत्पुर्वी अंतीम सामन्याची सुरूवात जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येवुन संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट व निर्वीवाद पंचगिरी करणार्‍या पंचाचा सत्कारही श्री. सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन करण्यात आला.
स्पर्धेचा अंतीम निकाल पुढील प्रमाणे – मुले प्रथम – श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव (लातूर विभाग), द्वितीय – आत्मामालीक इंग्लिश मेडीयम गुरूकुल अ‍ॅण्ड ज्युनीयन कॉलेज, कोकमठाम ता. कोपरगाव जि. अहमदनगर (पुणे विभाग), तृतीय – राजश्री छ. शाहु कनीष्ठ विद्यालय नवी मुबंई (मुंबई विभाग), मुली प्रथम – श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव (लातूर विभाग), द्वितीय – जिल्हा परीषद प्रा. शाळा भिकवडी बु. ता. खानापुर जिल्हा सांगली (कोल्हापूर विभाग), तृतीय – रा. फ . नाईक विद्यालय कोपरखैरणे, ता. जि. ठाणे (मुंबई विभाग). याच स्पर्धेतुन रांची, झारखंड याठिकाणी संपन्न होणार्‍या राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर करण्यात आला तो पुढील प्रमाणे मुले सोत्या कुसना वळवी, हारद्या सांत्या वसावे, भिमसिंग गारद्या वसावे (जिल्हा धाराशिव विभाग लातुर) जितेंद्र दिवाल्या वळवी,  उमेश शिवा वळवी (जिल्हा अहमदनगर विभाग पुणे) ओंकार राजाराम सावंत (जिल्हा मुबंई विभाग मुबंई), निलेश युवराज गवळी (जिल्हा व विभाग नाशीक), कृष्णा राम मुळक, (जिल्हा जालना, विभाग छ. संभाजीनगर), कार्तीक विजय फ रकटे (जिल्हा व विभाग कोल्हापुर), मयुर सुखदेव जाधव (जिल्हा सातारा विभाग कोल्हापुर), आदित्य प्रशांत भंगाळे ( जिल्हा व विभाग छ.संभाजीनगर), संजय पिन्टु गावडे (सांगली विभाग कोल्हापुर), साई रमेश लव्हाट, अहमदनगर, पुणे, विरसिंग खेमजी पाडवी, धाराशिव लातुर, सुदर्शन युवराज कामडी, नाशीक, विभाग नाशीक
मुली – कु. मुग्धा वैभव विर, कु. मैथली अरूण पवार, कु. आस्ना शब्बीर शेख, जिल्हा धाराशिव, विभाग लातुर, पायल विठ्ठल तामखडे, श्रावणी रामहरी तामखडे सांगली कोल्हापुर, कु. वैष्णवी कृशांत जाधव, नवी मुबंई, मुबंई, कु. निलम पांडुरंग मोहंडकर, नाशीक विभाग , चैताली अवधुत वडेकर, कोल्हापुर, वैष्णवी बळीराम सोनटक्के, जालना, कु. धनश्री दशरथ लव्हाळे, पुणे, कु. स्नेहा अनिल लामकाने, सोलापुर पुणे, मनस्वी भोजराज नेहारे, नागपुर, कु. जयश्री लक्ष्मण हुडीद, सांगली, कोल्हापुर, प्रणीती महादेव जगदाळे, नवी मुबंई, मुबंई, आर्या सुनील चोरमले, पुणे पुणे
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे, शेख मोहम्मद, डॉ. रेखा परदेसी, सोपान शिंदे, संतोष प्रसाद, हारुण खान, राहुल गायके, सचिन मोहीते, सचिन दोरखे, अमोल शिंदे, मधुकर अंभोरे, क्रीडा प्रबोधिनीचे सर्व शिक्षक व खेळाडू तसेच नियुक्त केलेल्या विवीध समित्यांचे पदाधिकारी सर्वश्री देवा चित्राल, कैलास नाटकर, क्रीडा संघटक परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे