pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ; लाभार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

0 1 7 2 5 0

जालना/प्रतिनिधी,दि.16 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेले संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचे  (चांभार, मोची, ढोर व होलार) जीवनमान उंचावण्यासाठी समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन 2013 ते 2017-18 पर्यंत असलेले प्रस्ताव निकाली काढण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. त्याकरीता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत केंद्र शासनाच्या योजना  एन.एस.एफ.डी.सी. महिला समृध्दी योजना व लघु ऋण वित्त योजना कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले आहेत, ज्यांची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपुर्ण कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली आहे. संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन खालीलप्रमाणे कागदपत्रे तात्काळ दाखल करावी.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना असा या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचा पत्ता आहे.
लाभार्थ्यांचा सिबिल केडीट स्कोअर रिपोर्ट, लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा विनंती अर्ज कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालु आहे, त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी दाखला, दोन सक्षम जामीनदारापैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा करण्यात येईल, असे कार्यालयाचे हमीपत्र, जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदान असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा 5 ते 6 वर्ष बाकी आहे असा जामीनदार देण्यात यावा, जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळ पाहणी अहवाल व शिफारस, अर्जदाराच्या वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र व त्यांचे आधारकार्डची झेरॉक्स प्रत, यापुवीर्‍ कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणुक आयोग ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक इत्यादी, लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक, जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक, अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत या जाहीराती द्वारे बांधवांना आवाहन करण्यात येत की, त्यांनी आपली कागदपत्रे तात्काळ पुर्ण करुन दाखल करण्यात यावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे