pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लॉज बनत चालले आहे गुन्हेगारी क्षेत्राचे अड्डे.

तारुण्यातील युवा पिढी कामवासनेच्या आहारी

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

सोशल मीडियाच्या आहारी गेलेली युवा पिढी चुकीच्या मार्गाने जात असलेलेची अनेक प्रकार समोर येत आहेत.अनेक प्रकरणे मोठया प्रमाणात पाहिली देखील आहेत.सध्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात लॉज संस्कृती वाढत असल्यामुळे भारतीय संस्कृतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शहराच्या ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी भक्तनिवास, विश्राम ग्रह,अनाथालय सुरुवातीच्या काळी असायची पर्यटन व भाविकांच्या सोयीच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता अगदी अल्प दरात आजही काही ठिकाणी सेवा दिली जाते पूर्वीच्या काळी मंदिराच्या ठिकाणी तेथील सेवेकरी भक्तांना आपल्या घरात आसरा देत होती त्यानंतर या काळामध्ये त्याचं रूपांतर हॉटेल व नवीन शब्दप्रयोग अमलात आला तो म्हणजे लॉज.आता हाच लॉज काही ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्राचा अड्डा बनत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.शहरात व ग्रामीण भागात लॉजची संख्या वाढली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा लॉज संख्या झपाट्याने वाढत आहे विशेष म्हणजे महाविद्यालयीन परिसरात लॉज ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे विशेष म्हणजे कॉलेज तरुण-तरुणी सध्या लॉजमध्ये मौजमजा करण्यासाठी लॉजचा वापर करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात सुद्धा लॉजची संख्या मोठी आहे या ठिकाणी नियम व अटी न पाळता लॉजमध्ये प्रवेश दिला जातो. ज्यादा पैसे देऊन बिनधास्त असे प्रकार सुरू असलेल्याचे अनेक तक्रारी समोर येत आहेत. आई वडील कष्ट करून मुलाला कॉलेजमध्ये घालतात परंतु कॉलेजच्या नावाखाली मुल मुली चुकीच्या दिशेने जात आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.स्कार्प तोंडावर बांधून सभ्यतेचा बुरखा घेऊन काही तरुणी कामवासनेत व मौज मजा करत स्टॅंडर्ड नावाखाली चुकीच्या मार्गाने जात आहेत. असे प्रकार वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलं मुली सुद्धा सध्या लॉजच्या आसपास दिसू लागली आहेत . स्वतःची हाऊस मौज मजा करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जात आहेत.रिलेशनशिप च्या नावाखाली चुकीच्या दिशेने तरुण-तरुणींचा कॉलेज युवतींचा प्रवास सुरू आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत असे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित कॉलेज तरुणी तरुण यांच्यावरती संबंधित चुकीचा प्रकार आढळल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी.तरच हे समस्या सुटणार आहेत.शहरातील असो वा ग्रामीण भागातील लाँज आणि अवैध धंदे हे समीकरण काही निवाळलेले दिसत नाही. अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी मध्ये कुठे ना कुठे लाँजचा संबंध जोडलाचं जातो. बर लोकांची सोय किंवा इतर बऱ्याच गोष्टी पाहता लाँज सोईस्कर ठरु शकतो परंतु अल्पवयीन मुले मुली यांचा लाँज वरील वावर आणि लाँज धारकांची पैश्यासाठी सर्व नियमांची पायमल्ली कितपत योग्य आहे? अल्पवयीन मुलींवरील अन्यायकारक गोष्टींचा खुलासा होताना बहुतांश प्रकरणात ठिकाण म्हणून लाँजवाल्यांचे नावे येतात परंतु तक्रार नोंदवताना लाँजधारक मात्र सहिसलामत बाहेर पडतो अश्या गोष्टींना आळा बसणे सध्या गरजेचे आहे.वेळीच जर लॉज संस्कृतीवर आळा घातला गेला नाही तर येणारी भविष्यातील पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर जनजागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे