pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नवी मुंबई आयुक्तलयाअंतर्गत कार्यरत असलेल्या न्हावाशेवा पोलीसांकडुन घरफोडी व इतर चो-या करण्या-या सराईत आरोपींना अटक.

0 1 7 4 0 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातुन रात्रीच्यावेळी मोठया प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी, घरफाडी, ट्रान्सफर्मर मधील वांयंडींग कॉपर वायर, ऑईल इतर चोरीच्या घटना घडत असल्याने, चोरीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच चोरीच्या घटनेतील आरोपीत यांचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ पनवेल पंकज डहाणे, व सहा. पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गांना दिले होते. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न्हावा शेवा पोलिसांनी केली आहे.मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपास वेगाने व चालु केली.योग्य दिशेने व वेगाने तपास यंत्रणा कामाला लागल्याने न्हावा शेवा पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत दि. ०५/०१/२०२३ रोजी पासुन ते दि. २३/०१/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा. चे दरम्यान जवाहरला नेहरू पोर्ट ऍथोरिटीच्या वित्त विभागाची महत्वाची जुनी कागदपत्रे ही सदर कार्यालयाकडुन जे.एन.पी.ए. टाऊनशिप सेक्टर. ३ येथील बिल्डींग क. ए. १८ मधील प्लॅट नं. ५,६,७ आणि ८ व बिल्डींग क. ए. १६ मधील प्लॅट नं. ९, ११ व १२ या सदनिकांमध्ये ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने वरील सदनिकांच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन घरफोडी करून त्यामधील मोठया प्रमाणावर साठा करून ठेवलेली शासकीय कागदपत्रे चोरी करून नेलेबाबत फिर्यादी गणेश बाळाराम पाटील वय. ५१ वर्ष, धंदा- नोकरी, राह. ए. १००१, अक्षर इस्टोनिया को.हौ. सोसायटी, सेक्टर. ४७, द्रोणागिरी नोड, ता. उरण, जि. रायगड. यांनी दिलेल्या तकारी वरून न्हावाशेवा पोलीस ठाणे, गु.रजि.नं. ५२/२०२३ भा.दं. वि. कलम. ४५४, ४५७, ३८०,४११, ३४ प्रमाणे दि. २८/०२/२०२३ रोजी १५:१३ वा. गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी १) मैनुद्दीन इलियास खान, वय ३५ वर्ष, रा. जमुहना, पो. खरसडी बाजार, ता. कटेला, जि. सिध्दार्थ नगर, राज्य-उत्तर प्रदेश व २) छोटु रामतीरथ केवट, वय ३९ वर्ष, रा. गुलेरी, पो. महादेव, ता. ढबरवा, जि. सिध्दार्थ नगर, राज्य-उत्तर प्रदेश यांना शिताफिने पकडुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल तपास केला असता सदर आरोपी यांनी नमुद गुन्हयांचे व्यतिरिक्त न्हावाशेवा पोलीस ठाणेच्या हद्दीत इतर ७ गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. आरोपी यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल व चोरी करणेसाठी वापरलेले वाहन असा एकुण ३,५०,०००/- रू. रकमेचा मुद्देमाल न्हावाशेवा पोलीस ठाणेकडुन हस्तगत करण्यात आलेला असुन गुन्हयातील आरोपी यांना दि. ०६/१२/२०२३ रोजी ०१:५२ वा. अटक करण्यात आलेली आहे.

वर नमुद गुन्हयातील आरोपी यांचेबाबत कोणत्याही स्वरूपाची उपयुक्त माहिती उपलब्ध नसताना न्हावाशेवा पोलीस ठाणे यांनी गुन्हयाच्या तपासात अथक प्रयत्न करून आरोपी यांची माहिती काढुन आरोपी यांना अटक करून वरील वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.त्यामुळे न्हावा शेवा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ पनवेल पंकज डहाणे, सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक संजय मोहिते, पोलीस उप निरीक्षक नितीन सांगळे, सफौ. लेंडे, पोहवा/१७३१ चेरू, पोहवा/६४ राजपुत, पोहवा /९३ शिंदे, पोहवा/२१४४ शिंदे, पोहवा/१९११ डाकी, पोहवा/१९०९ वसरे, पोहवा/२२४० सपकाळ, पोहवा / २३५० ढवळे, पोहवा/१९१४ गायकवाड, पोना / ३०४१ कवलगीर, पो.अं/३९३२ बडे यांनी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. नमुद गुन्हयाचा अधिक तपास न्हावाशेवा पोलीस ठाणे मार्फत चालु आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे