विरेगांवात ग्रामपंचायतीने घेतला दारू बंदीचा ठराव दारु मुळे अनेकाचे संसारात झगडे

विरेगाव/प्रतिनिधी,दि.9
जालना तालुक्यातील विरेगांव येथे ग्रामपंचायतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दि ०२ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन
ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेण्यात आला
दारु मुळे आनेकाचे संसार उध्वस्त झाले आसुन अल्पवयीन तरुन देखील दारुच्या आहारी गेले आहे
दारुमुळे घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आसुन तसेच कर्जाचे प्रमाण देखील वाढले आहे या प्रकरणी गावातील उपस्थित नागरिकांनी गावात दारूबंदी ठराव घेण्याची मागणी केली असता उपस्थित गांवकर्यांच्या साक्षिणे एकमताने ग्रामसभेत दारू बंदी ठराव मंजूर करण्यात आला आहे
या ग्रामसभेसाठी सरपंच सौ वर्षा सुरेश जाधव,उपसरपंच सुनील चव्हाण, सदस्य , मधुकर मोठे,अमोल जाधव, शिवाजी लिखे,बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर इंगळे ,ग्रामसेवक एस डी साबळे, पोलिस पाटील कैलास गुंजाळ,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बागल, मधुकर मोठे, सुभाष शिंदे, गणेश मोठे, रोहीदास राठोड, विशाल मोठे ,रोजगार सेवक भगवान जाधव, आशासेविका गायके मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यात लक्षमणराव जाधव,विठ्ठलराव जाधव, मुरलीधर लिखे, लिंबाजी लिखे,सुंदर नजान , विठ्ठल लिखे
बाबुराव घुंगरड, लक्ष्मण थोरात, शिवाजी थोरात, अंकुश घुंगरड,व तरुण मंडळ , सुरेश जाधव,भरत जाधव, एकनाथ शेळके,चांगदेव घुंगरड, अशोक जाधव, गजानन सोळंके,राम जाधव व इतर गांवकरी
उपस्थित होते.