ब्रेकिंग
जेईई परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी
0
3
2
1
6
3
जालना/प्रतिनिधी,दि.16
Join Entrance Examination & (Advanced) परीक्षा -2025 दि. 18 मे 2025 जिल्हातील जे.ई. एस. महाविद्यालय व इन्सिट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी या केंद्राकरीता परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडीक यांनी जारी केले आहे.
वरील आदेश दि. 18 मे 2025 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील.
0
3
2
1
6
3