रोजगार मेळाव्यातून 84 उमेदवारांची प्राथमिक निवड
जालना/प्रतिनिधी,दि.7
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जालना व मत्स्योदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 एप्रिल, 2025 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” व “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा” पार पडला. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 84 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या रोजगार मेळाव्यात 08 नामांकित कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मुलाखतीतून 84 उमेदवारांची विविध पदाकरिता प्राथमिक निवड केली. यात प्रीम सोल्यूशन प्रा. लि. (सलाम किसान) जालना 08, प्रीम सोल्यूशन प्रा. लि. जालना 03, कलश सीड्स प्रा. लि. जालना 15, एस.बी.आई इन्शुरेंस कंपनी लि. जालना 11, राजुरी स्टील्स टी एम टी बार्स प्रा. लि. जालना 16, प्रथम एजुकेशन फाउंडेशन छ. संभाजीनगर 10, रिध्दी सिध्दी सर्व्हिसेस, जालना 07, भाग्य लक्ष्मी रोलींग मिल्स प्रा. लि. जालना 14 याप्रमाणे उमेदवारांची निवड केली आहे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधव ढेरे यांनी केले तर आभार सुरेश बहुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे तसेच डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदिप डोळे, सुभाष पंडित, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, अमर तुपे, निर्मल बिडकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. संजय पाटील उप प्राचार्य, डॉ. संतोष करवंदे, डॉ. रामनाथ सांगळे, डॉ. कार्तिक गवांडे, डॉ. अर्जुन जाधव, डॉ. रामदास वैद्य यांनी तसेच महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. असेही कळविले आहे.