मुख्याध्यापक यांची बैठक संपन्न

बदनापूर/प्रतिनिधी,दि.25
आज (दि. 24) रोजी पंचायत समिती बदनापूर येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये येणाऱ्या फेब्रुवारी व मार्चमध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षे संदर्भात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था, सी सी कॅमेरे व्यवस्था व परीक्षा केंद्रावर संपूर्ण कॉफी मुक्त परीक्षा, परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधा, विद्यार्थी सुरक्षा, याविषयी सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन पंचायत समिती बदनापूर चे गटशिक्षणाधिकारी श्रीसागर एन.डी. यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी कॉफीमुक्तीची प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी बदनापूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हजर होते.