जालना : जालना जिल्ह्यातील उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा अच्युत मोरे यांना पुणे येथील बालगंधर्व रंगमदीरात सृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि.26) रोजी दुपारी 12.30 वाजता हा पुरस्कार केंद्रीय फिल्म सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. स्मिता बारवकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सौ. करुणा मोरे यांनी हिरकणी ग्रुपच्या माध्यमातनू राज्यातील विविध भागातील महिलांना न्याय मिळवून देणे व त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. तसेच गरजवंत महिलांना मदत करुन त्यांच्या आरोग्यासासाठी सतत मदत करुन महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अंबाजोगाई येथील सृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी डोंगरे, सचिव भारती एकलारे, उपाध्यक्षा माधुरी साळवे यांनी करुणा मोरे यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला होता.
सृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर, माई सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवारी पुणे येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय फिल्म सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. स्मिता बारवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सरचिटणीस डॉ. भावना घाणेकर, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगीता शिंदे, अभिनेत्री भावना शेणकर, उद्योजिका संगीता गुरव, समाजसेविका विद्या गडाख, पत्रकार अनुराधा सुरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा संपादक करुणा मोरे यांचे जालना जिल्ह्यातील पत्रकार बांधव, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा