जालना शहर महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण काढणे दुस-या दिवशीही मोहीम चालूच

जालना/प्रतिनिधी, दि.16
जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १६.०१.२०२५ रोजी शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण दुस-या दिवशीही मोहीम राबवुन काढण्यात आले. यामध्ये शहरातील भिमराज प्रवेशव्दारे ते वाळकेश्र्वर मंदिर पर्यंत रहदारीस अडथळा निर्माण करणारे आरसीसी वॉल कंपाऊंड, आरसीसी दुकाने असे एकूण १८-२० अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
सदरचे अतिक्रमण काढणेकरिता स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्री पंडित पवार सर्व स्वच्छता निरीक्षक, अधिनस्त सफाई कर्मचारी व वाहन व्यवस्थासह उपस्थित होते.
शहरातील सर्व नागरिकांना पुनश्च एकदा जालना शहर महानगरपालिका मार्फत विनंती करण्यात येते की, शहरात सदरची अतिक्रमण मोहीम अशीच निरंतर चालू राहणार आहे, तरी आपले अतिक्रमण क्षेत्र आपण स्वतः काढून घ्यावे, नसता जालना शहर महानगरपालिका मार्फत कारवाई करण्यात येईल.