pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

  जाहिरात नाही तर बातमी नाही; वृत्तपत्रांचा निर्णय अनाधिकृत बॅनरबाजीविरोधात मनपा-आरटीओला निवेदन देणार

0 1 7 4 0 9
जालना/ प्रतिनिधी,दि.19
जिल्ह्यातील वृत्तपत्रांच्या जाहिराती गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी झाल्या असून त्यामुळे वृत्तपत्रे चालविणे जिकीरिचे झाले आहे. याचा गांभीर्याने विचार केला असता बॅनरबाजीच्या वाढत्या प्रभावामुळे जाहिरातीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे जाहिरात न दिल्यास बातम्यांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
यासंदर्भात सोमवार (दि 19) रोजी झालेल्या बैठकीस दैनिक नवराष्ट्रचे राजेश भीसे, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश शिंदे, दै. पार्श्वभूमीचे महेश बुलगे, दै. बदलता महाराष्ट्रचे शरद सोनटक्के, मराठवाडा पत्रचे चेतन साबळे, दैनिक जगमित्रचे संतोष भुतेकर, दै. काव्यरत्नचे अतुल पडुळ, युवा आदर्शचे दीपक शेळके आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रस्वावना करतांना दीपक शेळके यांनी म्हटले की, जाहिरातींच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. शहरासह जिल्ह्यात होत असलेली बॅनरबाजी-फलकबाजी, रंगवलेल्या भिंती, अ‍ॅटोरिक्षा मागील बॅनर आदींमुळे जाहिरातीवर परिणाम होत असून जो-तो बॅनरबाजी करण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहे. यामुळे शहर विद्रुपिकरणातही भर पडत आहे. अनाधिकत बॅनरची संख्याही वाढलेली आहे. महानगर पालिका याकडे लक्ष देत नाही. जागो-जागो बॅनर लावले जात आहेत. बॅनर लावण्याचे आपण कुणालाही बंधन टाकू शकत नाही हेे जरी खरे असले तरी शहर विद्रुपिकरणात भर घालणारे आणि अनाधिकृत बॅनरबाजीवर अंकुश लावल्यास बॅनरची संख्या कमी होईल. राजकीय नेत्यांचे वाढदिवस असो, सामाजिक-राजकीय नेते, कोचिंग क्लासेसवाले, शैक्षणिक संस्था, हॉस्पीटल, मॉल आदी विविध संस्था ह्या बॅनरबाजी करतात. दुसरे म्हणजे जर यांच्याकडे बॅनरबाजीसाठी बजेट आहे तरी वृत्तपत्रांच्या जाहीरातीसाठी देखील त्यांनी बजेट ठेवले पाहिजे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांच्या बातम्या – छायाचित्र हे वृत्तपत्र प्रसिद्ध करतात. प्रसिद्धीसाठी त्यांना वृत्तपत्रांचा सहारा लागतो आणि जाहिरातीसाठी बॅनरबाजी? या प्रकाराकडे पाहता ज्याची जाहिरात असेल त्याचीच बातमी प्रकाशित करायची अन्यथा त्या बातम्यांवर सर्वांनीच बहिष्कार टाकायचा. तसेच अनाधिकृत बॅनरबाजी संदर्भात महानगर पालिका जालना व आरटीओ जालना यांना निवेदन देऊन तात्काळ ते हटविण्यात यावे व भविष्यात पुन्हा त्या ठिकाणी बॅनर लागू नये यासाठी मनपाने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही दीपक शेळके यांनी सांगितले.
यावर सर्व पत्रकारांनी आपआपली मते मांडली. यावर सर्वांनुमते जाहिरात न दिल्यास बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी एक जिल्हा समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार आहे. चर्चेत बातमी पाठविणार्‍यांसंदर्भातील मुद्दा ही पुढे आला असून त्यासाठी जे बातम्या पाठवितात त्यांनी वृत्तपत्रांचा वर्धापन दिवस, दिवाळी, त्यांचे वाढदिवस अशा स्वरुपाने वर्षभरातून किमान तीन ते चार जाहिरातींची वृत्तपत्रांची अपेक्षा असल्याचे संबंधीतास कळवावे. व त्यांचा यास होकार असल्यास बातम्या पाठवाव्यात, असेही या बैठकीत एकमताने ठरले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे