pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

  कबड्डी असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी स्पर्धा

0 3 1 5 3 1
जालना/प्रतिनिधी, दि.6
जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्य किशोर किशेरी गटच्या (मुले, मुली) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी दि.1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहेे. हा निकष पूर्ण करु शकरार्‍या मुलां, मुलीच या स्पर्धेसाठी  पात्र ठरणार आहेत, याची नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यावी, या स्पर्धेसाठी आधार काड, जन्माचा दाखला (शाळेचा) ही कागदपत्रे सुध्दा आवश्यक असून ही कागदपत्रे जमा करणार्‍या खेळाडूंनाच या निवड चाचणीत सहभागी होता होणार आहे. सहभागी होऊ इच्छणार्‍या सवर्व संघाच्या व्यवस्थापकांंनी आपल्या संघाची नोंदणी दि. 8 फेब्रुंवारी 2025 पर्यंंत राहुल वाहुळे – 98235 55802, बाबासाहेब मंडाळे- 98236 61861, रामदास निहाळ- 94216 84393 यांच्याशी संपर्क साधावा. ही निवड चाचणी स्पर्धा जिल्हा परिषद शाळा, पिरपिंपळगांव (श्रीक्षेत्र राजूर रोड) ता. जालना येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारय्या संघासाठी 200 रुपये नोंदणी फीस आकारण्यात आली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी होऊन कबड्डी असोसिएशनला सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनचे डॉ. अशोक हजारे, नंदकिशोर खर्डेकर, डॉ. देवेश पाथ्रीकर, माधवी काळे, भास्कर पालवे, रामदास निहाळ, अशोक पांगारकर, अक्षय गोरंट्याल, प्रशांत तेलगड यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे