pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे बंधनकारक 

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.10

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2023 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना मार्फत सुरू आहे. तरी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दि. 1 जुलै 2023 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे बंधनकारक आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahasdb.maharashtra.gov.inव https://mahades.maharashtra.gov.in/CGE या लिंकवर जावून अधिकारी व कर्मचारी यांची महिती अद्ययावत करावयाची आहे. सदर माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र- 1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर 2023 देय माहे डिसेंबर-2023 ची वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करुन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना यांच्याकडे सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी  कुंदन कांबळे,  उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना ०२४८२-२२५१५० / ९८६०३४८८७१ ई-मेल – statjalna@gmail.com  यावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4