राज्यस्तरीय ज्युनीयर नेटबॉल स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी,दि.17
अॅम्युचर नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान नांदेड येथे आयोजीत 17 व्या राज्यस्तरीय ज्युनीयर नेटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरीता दि. 19 नोव्हेंबर 2023 रवीवार रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासुन पाठक कॉम्पलेक्स समोर, मुक्तेश्वर वेशी जवळ, कचेरी रोड, जुना जालना येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडुचे वय 18 वर्षे व जन्मतारीख 01/03/2005 नंतरची असावी. निवड चाचणीमधुन 12 मुले व 12 मुलींची निवड करण्यात येईल. निवड झालेले खेळाडु राज्यस्पर्धेत जालना जिल्हयाचे प्रतिनीधीत्व करतील.
निवड चाचणी व स्पर्धेच्या अधिक माहीती करीता जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, जयकुमार वाहुळे, मंगेश सोरटी, संतोष वाघ, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा.
तरी सदर निवड चाचणीचा जास्तीत तास्त खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाला परसदेसी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी, तालुका क्रीडा संयोजक यशवंत कुलकर्णी तसेच जालना पिथीयन कॉन्सील, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन, कला क्रीडा दूत फाऊंडेशन व जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या पदाधिकार्यांंनी केले आहे.