आरोग्य उपसंचालिका डाॅ. भोसले यांची बरडशेवाळा आरोग्य केंद्राला भेट
समाधान व्यक्त करीत आवश्यक त्या केल्या सुचना

हदगाव/प्रभाकर डुरके,दि 17
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत अती संवेदनशील असलेले बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन वर्षांपासुन दोन्ही आलेले अनुभवी व निवासी राहुन काम करत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी भिसे व डाॅ.के.सी.बरगे यांनी कर्मचारीवर्गासोबत काम करत कार्यक्षेत्रात समाधान कारक काम करत यशाची पंरपरा कायम ठेवत यावर्षीही कुटुंब शस्त्रक्रियेसह विविध सेवेत कौतुकास्पद कामाने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या कामाची लोकप्रतीनीधीसह प्रशासनाकडून दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात राहिलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी लाखो रुपयाच्या निधीतून काम सुरुवात आहेत. शवविच्छेदनासह विविध मार्ग
लागणार असून जिल्ह्यात नावलौकीक ठरणार आहे.
बुधवार सतरा एप्रील रोजी लातूर परीमंडळ विभागाच्या उप संचालिका डाॅ. भोसले यांनी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन दिली . यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील सर्व वार्डासह परीसरातील सुरु असलेल्या कामासह कामाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. अधिकारी कर्मचारीवर्गाकडुन कामासह केलेल्या वृक्ष संगोपनाचे कार्याचे समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्या हस्ते परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. वरिष्ठ अधिका-याच्या भेटीत रात्रीपासुन अद्याप विद्युत खंडीत असल्याने नेहमीच्या विद्युत खंडीत चा विषय चर्चेचा ठरला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी. भि़से, डॉ. के. सी. बरगे , समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ ए. पी. आरेवार, ,आरोग्य सहाय्यक. एस.जे. स्वामी, बि.डी. राठोड आरोग्य सहायिका एल. एम.वाघमारे, औषध निर्माण अधिकारी जी. यू. देशमुख व आरोग्य सेविका व्ही. के. काळसरे , एस. बी. टेकाळे, अधिपरिचारिका जे. के. पङघणे, कनिष्ठ सहाय्यक एस. एन. सूर्यवंशी, कार्यक्रम सहाय्यक एस. बी. पांढरे, प्रयोगशाळातंत्रज्ञ आश्लेषा गाडे प्रयोगशाळातंत्रज्ञ सय्यद अस्लम, वाहनचालक गजानन राठोड परिचर शेख इस्माईल बी.बी. थाटे, पत्रकार प्रभाकर दहिभाते उपस्थित होते.