pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रप्रमुख गणेश गिराम यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जालना जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सत्कार

0 1 7 4 1 1

जालना/प्रतिनिधी, दि.26

आज ( दि. 25) रोज गुरुवार रोजी बद्रीनाथ बारवाल महाविद्यालय जालना येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त व निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या तर्फ मतदार यादी पुनर्परीक्षण व वेळोवेळी आयोगातर्फे आयोजित केलेल्या खास मोहिमे अंतर्गत व विविध शालेय व मतदार उपक्रम व प्रकल्पाअंतर्गत स्त्री दिव्यांग तृतीय पंथ व मागासवर्गीय मतदारांची विशेष नोंदणी ठरवून दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सुपरवायझर पुरस्कार बदनापूर तालुक्यातील केळीगव्हान केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश गिराम यांना जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे अपर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी संगीता सानप मनीषा दांडगे संगीता सुत्रावे शिक्षणाधिकारी मंगल ताई तुपे उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत विनया वडजे बद्रीनारायण बारवाल कॉलेजचे प्राचार्य डॉ.भूषण नाफाडे प्राध्यापक विलास भुतेकर स्वीप आयकॉन किशोर डांगे दिव्यांग स्वीप आयकॉन निकेश मदारे जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर उपजिल्हा अधिकारी शशिकांत हदगल जालन्याचे तहसीलदार श्रीमती छाया पवार, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके इत्यादी प्रमुख उपस्थिती होती या यशाबद्दल बदनापूर प.स.गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर एन.डी. यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे