राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण
पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते रविंद्र हरिश्चंद्र चव्हाण(महाड )यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी आजपर्यंत दिलेले योगदान, पक्षाचे तळागाळात प्रचार प्रसार करणे, संघटनात्मक मोट बांधणे, पक्षाचे ध्येय धोरणे जनते पर्यंत पोहोचविणे आदी कार्याचा विचार करून रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सदर नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार आणि संसदरत्न खा. सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोकण विभागीय अध्यक्ष मा. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदिती ताई नलावडे व रायगड जिल्हय़ातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन रविंद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरत यांनीही रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.रविंद्र चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरत यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच रविंद्र चव्हाण यांना रायगड जिल्हाध्यक्ष करण्यात संतोष घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. रविंद्र चव्हाण यांना रायगड जिल्हाध्यक्ष करण्यासाठी संतोष घरत यांनी विशेष मेहनत घेतली आहे.कट्टर प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले व गोर गरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणारे रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी रविंद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.