जालना शहरातील दुचाकी चोरणारे 02 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद करुन 16 दुचाकी केल्या जप्त

जालना/प्रतिनिधी, दि.26
जालना जिल्हयामध्ये दुचाकी चोरांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब, जालना व मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, जालना यानी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांनी दुचाकी चोरांसाठी विशेष पथक तयार करुन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 26/07/2024 रोजी जालना शहरामध्ये इसम सय्यद अल्ताफ सय्यद अहमद, वय-21 वर्ष, रा. नॅशनलनगर, जालना हा त्याच्या साथीदारांसोबत मोटार सायकल चोरी करीत असल्याबाबत गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्याचा विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी त्याचा मित्र महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोडीन, वय- 19 वर्ष, रा.कुचरवटा, जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशांनी मिळुन जालना शहरातील मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन, वय 19 वर्ष, रा. कुचरवटा, जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता गुन्हयातील विधी संघर्षग्रस्त बालकाने जालना शहरातील विविध ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी करुन आरोपी नामे सय्यद अल्ताफ सय्यद अहमद व महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन यांना विक्रीकामी आणुन दिल्या व सदरच्या मोटार सायकली फायनान्स कंपनीने ओढून आणलेल्या असल्याचे भासवुन जालना शहरातील नागरीकांना मोटार सायकल विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ज्यांना मोटार सायकल विक्री केल्या त्या इसमांकडुन 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीकडून वरील 16 मोटार सायकल हया सदर बाजार, चंदनझिरा, कदीम जालना, तालुका जालना व हसनाबाद पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, पोनि. श्री. सय्यद मजहर, सपोनि, योगेश उबाळे, सपोनि, शांतीलाल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सैम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, प्रशांत लोखंडे, सतिष श्रीवास, अक्क्रूर धांडगे, धीरज भोसले सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.