pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तांबेकर यांचा सेवानिवृत्ती बद्दल गौरव

0 3 8 3 5 2

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 13

टेंभुर्णी- येथील जेबीके विद्यालयातील कर्मचारी दगडूबा तांबेकर हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले. यामुळे त्यांचा शाळा व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी तांबेकर यांच्या सेवेचा गौरव केला. आपल्या ३० वर्षाच्या सेवाकाळात शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही असे भावोद्गार यावेळी दगडूबा तांबेकर यांनी काढले. यावेळी टेंभुर्णी चे माजी सरपंच विष्णू जमधडे, नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर संचालक प्रा. दत्ता देशमुख, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे, गणपत भिताडे, सुरेश बोर्डे, मुख्याध्यापक विष्णू जाधव, सखाराम बोरकर, संजय कुलकर्णी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. फोटो – जेबीके विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी दगडूबा तांबेकर यांचा गौरव करताना शाळेतील शिक्षक व मित्रपरिवार.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे