कृषी महाविद्यालय, खरपुडी येथे विद्यार्थिनींच्या नाटिका सादरीकरणाने प्रेक्षकांचे अश्रू अनावर

जालना/प्रतिनिधी, दि.28
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना येथे कृषी भूषण माननीय श्री. भगवान दादा काळे, विश्वस्त मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संचलित आमची शाळा, बळीराजा अकॅडमी, कृषी तंत्र विद्यालय तसेच कृषी महाविद्यालय खरपुडीतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कृषी महाविद्यालय खरपुडीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख चौधरी मॅडम, प्राध्यापिका चाटे मॅडम, प्रा. सहाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम नाटिका, देशभक्तीपर गीतगायन, दि रियल हिरो- आर्मी मॅन इ. कार्यक्रमांचे सादरीकरण केले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या द रियल हिरो-आर्मी मॅन या नाटीकेने भारतातील लष्करी जवानांचा खडतर जीवन प्रवास दाखविला. हा जीवन प्रवास बघून प्रेक्षकांचे अश्रू अनावर झाले.
सदर कार्यक्रमास डॉ. देशमुख सर, खरात सर, कोळकर सर, सोनुने सर, शिक्षक वृंद, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, इतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.