pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

30 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासह मार्गदर्शनाचा गरजुनी लाभ घ्यावा बाबुराव कदम कोहळीकर

0 1 7 2 5 9

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.20

साधारण आजार वेळेतच उपचार केले तर निश्चितच फायदेशीर ठरते पण हे आजार सर्व सामान्य कुटुंबासाठी खाजगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नसल्याने आजही अनेक रुग्णांना परीस्थिती मुळे नाईलाजाने आजार अंगावर घ्यावा लागतो. परीणामी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.अशा गरजु कुटुंबासाठी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव हिमायतनगर तालुक्यातील मागील काही वर्षांपासून रुग्णांना नेत्र शिबिरासह विविध प्रकारे उपचारांसाठी सहकार्य केले आहे. तिस एप्रिल रोजी दत्ता मेघे उच्च शिक्षण संचलीत आचार्य विनोबा भावे सांवगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव वांरगा रोडवर वडकुते पेट्रोल पंपाच्या समोर वेंकटरमणा शाळेत तिस एप्रिल रोजी सकाळी सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबीराचे आयोजन केले तर दुसऱ्या सत्रात महिलांसाठी गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील व वनश्री ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष आर. ऐ.राठोड यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे.तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कंपनीसह विविध ठिकाणी युवक युवती यांच्या साठी भव्य नौकरी भरती प्रक्रिया आयोजित केली असुन या कार्यक्रमाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.तरी हदगांव हिमायतनगर तालुक्यातील गरजुसाठी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान व उपचार शिबिरासह मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.ही माहिती आपण आपल्या आजुबाजूच्या गरजुंपर्यंत पोहचण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार कवानकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेल्या पळसा येथील आदी शक्ती गो शाळेतील जनावरांना चारा वाटप कार्यक्रमात उपस्थित सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते यांना केले.
यावेळी भाजपा विधानसभा समन्वयक निळु पाटील,पळसा संरपंच प्रतिनिधी रणजीत कांबळे, बामणी उपसंरपंच अक्षय पवार, शंकर जगदाळे, पळसा ग्रामपंचायत सदस्य कामाजी निमडगे ज्ञानेश्वर हराळे , दिपकराव पाटील, गजानन मस्के, सामाजिक कार्यकर्ते विशाल शिरफुले बरडशेवाळेकर, राजु चिंचोलकर, अशोक जाधव, बालाजी चेपुरवार विकास कांबळे , हरीभाऊ सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी, पळसा सह परीसरातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे