आधी रस्ते तयार करा अन्यथा रेती वाहतूक बंद करा, जिल्हाधिकारी यांना निंभार्णी वासियांचे निमंत्रण

मोर्शी/ प्रतिनिधि,दि.17
मोर्शी तालुक्यातील रेती घटांचा लिलाव महसूल प्रशसनाने केला. तत्पूर्वी रेती घाटाचा लिलाव कारण्यात आला. दोन वर्षा पासून लीलावर बंदी घातली होती या वर्षी आलटून-पालटून रेतीघाट लिलाव करण्यात आला आहे. रेती घाटावर जाणारे रस्ते तथा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गावाला जातांनी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. आधी रस्ते दुरुस्त करा नंतरच रेतीची वाहतूक करा असा इशारा निंभार्णी ग्रामवाशीयांनी दिला आहे तालुक्यातून वर्धा नदी वाहते. येथे रेती घाटांची संख्या जास्त आहे. या खेपेला महसूल प्रशासनाने चिंचोली येथील रेती घाट लिलाव केला आहे. निंभार्णी राजुरवाडी गावांना जाणाऱ्या व चिंचोली शिवरा पांदण रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. एक ते दीड फूट खोल व एक ते दोन मिटर लांब असे जीवघेणे खड्डे पडले आहेत. २५ ते ४० टन रेती ट्रीप वाहतूक या मार्गावर एका महिन्यापासून पासून सुरु आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. हे विशेष.निंभार्णी चिंचोली रेती घाटातून रेतीचे ट्रॅक्टर ट्रॅक शिवरा या मार्गाने न जाता निंभार्णी राजुरवाडी या मार्गाने जातात. या मार्गावर गावे आहेत. रस्ता अरुंद आहे. रस्त्याची क्षमता नाही. ओव्हरलोड ट्रॅकर ट्रक या मार्गाने सर्रास मार्गक्रमण करतात तालुक्यातील रेतीची वाहतूक याच मार्गाने केली जात आहे. रेती घाट लिलाव करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यानी घाटावर जाणारे रस्ते त्यांची स्थिती काय आहे? याची पाहणी करणे अंत्यत गरजेचे झाले आहे. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी स्थानिक तहसिलदारांनी रेतीघाट लिलाव प्रक्रीयेत घाट लिलावात समावेश पूर्वी आक्षेप घेण्याची गरज आहे. रस्ते येथे जीव घेणारे ठरले आहेत. गावातून जाणारा रस्ता मृत्यूमार्ग ठरले आहेत.राज्य शासनाला कोट्यावधींचा महसूल देणाऱ्या रेतीघाट गावांना जाणारे रस्ते आधी तयार न केल्यास रेतीची वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा निंभार्णी व चिंचोली येथील ग्रामस्थांनी यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे स्थानिक ग्रामस्थासह तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.


