मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीची जालन्यात 12 ऑक्टोबरला बैठक
सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; दुपारी 2 वा. नागरिकांकडून स्विकारले जाणार पुरावे

जालना/प्रतिनिधी,दि.11
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) हे गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या वेळेत राखीव. दुपारी 2 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून पुरावे स्विकारतील आणि सायंकाळी 4 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.