मो. गोंडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पशुरोग निदान शिबिर

हिंगोली/प्रतिनिधी,दि.30
दि.29 जानेवारी 2025 तोष्णीवाल महाविद्यालयात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवक शिबिराचे आयोजन गोंडाळा येथे संपन्न होत आहे दिनांक 29 जानेवारी 2025( बुधवार )रोजी पशुरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आली होती याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वंशेश्वर गो शाळा समन्वयक भीमराव कोळेकर तर शिबिरासाठी उपस्थित असलेली तज्ञ मंडळी की जात डी पी डॉ पी एस निचळ सहाय्यक आयुक्त (पशुवैद्यकीय अधिकारी )डॉ शेख नूर मोहम्मद पशुधन
वैद्यकीय अधिकारी सेनगाव डॉ राज निंबोळी रवी कांबळे पशुधन पर्यवेक्षक आदी तज्ञ मंडळी शिबिरास उपस्थित होती शिबिराच्या प्रारंभी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे गाईचे पूजन करत पशुधनाची श्रीमंती हीच देशाची संपत्ती होय डॉ एस निचळ यांनी लसीकरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की अनेक रोग जनावरांच्या संपर्कातून मनुष्यास होत आहे त्यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. देशी पशुधन टिकविणे काळाची गरज असून त्यास आपण सॉफ्ट पॉवर या नावाने संबधू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डीडी थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा नाईक एपी यांनी मांडली डॉ. मरकड प्रा. निलेश गायकवाड डॉ. पवार आदी मान्यवर मंडळींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.