पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेला उत्तम प्रतिसाद.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी गणेशोत्सव काळात पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गणेशोत्सव स्पर्धेला भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला. पूर्व विभागातून स्पर्धेत प्रथम क्रमांक भास्कर धनाजी मोकल(चिरनेर ), द्वितीय क्रमांक अभय काशिनाथ पाटील (कोप्रोली )तर तृतीय क्रमांक प्रफुल्ल केणी (भोम )यांनी पटकविला.तर उरण विभागातून प्रथम क्रमांक समीर पाटील (करंजा रोड ), द्वितीय क्रमांक सुरज मोरे (बोरी )तर तृतीय क्रमांक हर्ष पवार (पेन्शनर्स पार्क, उरण )यांनी पटकाविला. या सर्व विजेते उमेदवारांच्या घरी जाउन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.