pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंबड ते चौंडी बस सुरु करा,सकल धनगर समाजाची मागणी

आगार प्रमुख यांना दिले मागणीचे निवेदन

0 1 7 9 5 4

जालना/प्रतिनिधी, दि.9

अंबड तालुक्यातील धनगर सम ाज बांधवांबरोबरच, बदनापूर, घनसावंगी, परतुर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने विभागीय वाहतूक नियंत्रक जालना विभाग व अंबड बस आगार व्यवस्थापक यांना अंबड ते चौंडी थेट बस सेवा सुरू करण्या बाबत निवेदन देण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ पावन भूमी चोंडी तालुका जामखेड असून संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच भारतातून असंख्य राष्ट्रमाता भक्त चौंडी या गावी नतमस्तक होण्यासाठी येतात. ३१ मे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनानिमित्त या पवित्र भूमीस नतमस्तक होण्यासाठी माता भगिनी, आबालविरुद्ध, तरुण तरुणी, लहान बालके भक्तजन आपल्या संपूर्ण परिवारासहीत मोठ्या संख्येने आवर्जून जात असतात.

अंबड शहर व संपूर्ण अंबड तालुक्याबरोबरच शेजारील घनसावंगी, बदनापूर, परतूर, जालना, जाफराबाद, भोकरदन तालुक्यात धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अंबड आगारातून व जालना जिल्ह्यातील इतर कुठल्याही आगारातून थेट बस चौंडी येथे जात नसल्यामुळे या पावन नगरीत नतम स्तक होण्यास जाणाऱ्या भक्तांची अत्यंत गैरसोय होऊन आर्थिक फटकाही सहन करावा लागतो तसेच वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अंबड ते चोंडी अशी प्रवासी बस अंबड आगारातून सुरू करण्यात यावी ज्यामुळे ६ तालुक्यातील प्रवाशांबरोबरच या मार्गावर असणाऱ्या वडीगोद्री, शहागड, गेवराई, बीड, पाटोदा, जामखेड भागातील प्रवाशांना या बसची सेवा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे अंबड ते चौंडी बसला मागच्या वर्षी प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला असून प्रवासी भारमान चांगले होते. त्यामुळे एसटी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला होता. संपूर्ण परिवारासहित अंबड ते चोंडी बसने पावन भूमी चौंडी येथे जाऊन नतमस्तक होऊन परत त्याच बसने प्रवाशांना वापस येणे या बस सेवे मुळे शक्य होईल. माता भगिनींना या थेट प्रवासी बस मुळे चांगली सुविधा प्राप्त होईल. तरी एसटी प्रशासनाने सहा तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांची मागणी विचारात घेऊन कार्य तत्परता दाखवत बस सुरू करावी अशी विनंती करण्यात आली आहे. आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच ही प्रवासी बस सुरू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी जय खरात, लक्ष्मण बेवले, संतोष भोजने, दत्ता लोहकरे, भगवान भोजने, कांता ठोके, गणेश लोहकरे, अनिल राऊत, सिद्ध पंत कुलकर्णी, अनिल भालेकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे