यशवंती आधार समाजिक संस्थेने केली निराधार,अनाथ, दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड
"एक घास प्रेमाचा" या प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रम आश्रम, दिव्यांग आश्रम, अनाथ आश्रम तसेच निराधार बांधवांना ब्लॅकेट व फराळ वाटून दिवाळी गोड केली.- मा.राजेश दिवटे

पाटोदा/प्रतिनिधी,दि.4
दिवटे सर खूप बरे वाटले आपण एवढ्या प्रेमाने दिवाळी फराळ आणला आम्हाला भरवला…. हे शब्द ऐकून मन भाराहून गेले.
*यशवंती आधार सामाजिक संस्थेच्या* वतीने *_एक घास प्रेमाचा_* या उपक्रमाच्या माध्यमातून *अनाथ, निराधार दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी फराळ वाटप केला जात* *आहे* हा उपक्रम निगडी येथिल झुंज दिव्यांग आश्रमामध्ये राबवला तसेच दिघी येथील स्नेहछाया अनाथल, आळंदी येथील आपुलकी वृद्धाश्रम तसेच पुलाखाली व पालवर राहणाऱ्या निराधार बांधवांसाठी राबवला. या सर्व कार्यामध्ये संस्थेचे मार्गदर्शक गोसेवक सेवक संतोष सुरवसे साहेब, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुख जयपालजी दगडे साहेब, यशवंती आधार सामजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणादायी वक्ते राजेश दिवटे सर हा प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत व त्यांच्या या कार्याला भरभरून प्रतिसादही मिळत आहे.तसेच या उपक्रमासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने राजेश दिवटे यांनी मनापासून आभार मानले.