pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ई-पिक पाहणी करुन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि. 28

हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानूसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडिद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभुत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपुर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे