pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित

0 1 7 4 7 6

जालना/प्रतिनिधी,दि. 3 

जालना जिल्ह्यामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत करून चांगले खेळाडू तयार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन खेळाडूंच्या शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास व खेळाची आवड निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

फुटबॉल व खो-खो या खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास व नवीन विद्यार्थी खेळाडूंना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल जालना व कै. नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी ता. बदनापुर जि. जालना येथे दि. 16 ते 30 एप्रिल 2024 सकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत आणि सांयकाळी 5 ते 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत करण्यात आले आहे. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरासाठी कार्यालयातील खो-खो क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे व फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख यांच्याकडे नोंदणी करावी. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे