शिवसेना पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
महायुतीचे सरकार महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नशील असून महिलांच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी हातभार लावत आहे. म्हणून महिलांनी आता विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. महायुतीने महिलांसाठी लाडकी बहीण योजना मोठया प्रमाणात राबविली. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदविले नसतील त्यांनी आपले नाव त्वरित नोंदवावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रवीण राम ठाकूर यांनी उलवे येथे केले.
शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून श्री साई मंदिर, सेक्टर ९, उलवे नोड येथे महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच महिलांच्या विविध योजना, उपक्रम या विषयी जनजागृती करण्यात आली. विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. यावेळी महिला शहर प्रमुख सोनल घरत, उलवे शहर प्रमुख संदीप वायंगणकर, जीवन परसे (कळंबोली )तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगर परिषद, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत महिला भगिनींनी महायुतीला मोठया प्रमाणात मतदान करावे. महायुतीचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात निवडून द्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.