अज्ञात व्यक्तीने पेटवलेल्या झाडामुळे स्थानिक जागरूक नागरिक व नगरसेविका महानगरपालिकेच्या फायर कर्मचाऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली

जालना/प्रतिनिधी, दि.25
रेल्वे स्टेशनरोड ते पीती पेट्रोल पंप मुख्य रोडलगत रेल्वे स्टेशन हद्दीत चिंचेचे झाड अज्ञात व्यक्तीने खोडा पासून पेटविल्याने मोठी दुर्घटना घडणार होती,परंतु इन्कम टॅक्स कॉलनी येथील जागरूक नागरिक प्राध्यापक गणेश भुतेकर सर, कॉन्ट्रॅक्टर संदीप पाटील,
यांनी नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांना मोबाईल करून तात्काळ सरील घटना सांगितली असता सौ देठे यांनी फायर विभागाला मोबाईल करून फायर विभागातील श्री संतोष काळे व त्यांच्या संपूर्ण टीमने सतर्कपणे या झाडाची आग विझवली व मुख्य रोडवर मोठी दुर्घटना होण्यापासून थांबविले या मुख्य रोडवर झाडालगत विद्युत पोल व अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत.
या प्रसंगी महानगरपालिकेचे उद्यान प्रमुख सचिन पितळे, श्री संजय देठे श्री संदीप गायकवाड पाटील, श्री संजय हिरे ,वाहन चालक श्री सुरज काळे फायरमन श्री किशोरजी आधी घटनास्थळी उपस्थित होते.