pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोतवाल भरती परीक्षेचे हॉलटिकीट दि. 29 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयात उपलब्ध

0 1 7 4 0 8

                                                                    जालना/प्रतिनिधी,दि. 27

कोतवाल निवड समिती तालुका बदनापुर मार्फत रिक्त असलेल्या कोतवाल पदासाठी दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.  सदर परीक्षा आता दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे (हॉलटीकीटचे) वितरण तहसील कार्यालय, बदनापूर येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून दि. 29 सप्टेंबर 2023 पासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येईल. कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय बदनापूर येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेतांना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, पासपोर्ट ओळखपत्र, मतदार ओळखपत्र यापैकी एकाची मुळ प्रत आणावी. असे तालुका निवड समिती तथा तहसीलदार बदनापुर सुमन मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे