pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.21

घनसावंगी पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण रुग्णालयाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीच्या गेटजवळील नाल्यात लिंबाच्या झाडाखाली एका अनोळखी अंदाजे 40 ते 45 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास पोलिस ठाणे, घनसावंगी यांना माहिती द्यावी, असे आवाहन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे यांनी केले आहे.
घनसावंगी पोलिस ठाणे यांनी मरणोत्तर पंचनामा करुन या पुरुषाच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात दि.10 ऑगस्ट 2023 रोजी पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणी दि.10 ऑगस्ट रोजी बुऱ्हाणखाँ उमरखाँ पठाण वय 44 वर्ष यांनी  दिलेल्या खबरीवरुन आमॉ34/2023 कलम 174 सीआरपीसीप्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुरुषाचा मृतदेह अंदाजे उंची 165 सेमी असून पांढऱ्या रंगाचा शर्ट ज्यावर निळ्या रेषा व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तरी या वर्णनाच्या अनोळखी पुरुषासंबंधी काही माहिती असल्यास किंवा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार असल्यास किंवा गुन्हा दाखल असल्यास पोलिस ठाणे घनसावंगी यांना माहिती द्यावी. माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक पी. डब्ल्यू. त्रिभूवन (मो.9823067443), पोलिस उपनिरीक्षक पी.डी.डोलारे (मो.8605103703), हेड काँस्टेबल आर.वाय. वैराळ (मो.8668703254) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस उपनिरीक्षक, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे