pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुर्तड पळखेडा येथे नागेश्वर संस्थान वर शनैश्वर जयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा

हजारों भाविकांना आमरसाचे जेवण.

0 3 2 3 9 4

भोकरदन/ संजीव पाटील,दि.27

भोकरदन तालुक्यातील सुरंगली पासून जवळ असलेल्या मुर्तड पळखेडा येथे नागेश्वर संस्थान वर काल दिनांक 26 में मंगळवार शनैश्वर जयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागेश्वर संस्थान चे मठाधिपती हभप गंजिधर महाराज यांनी तसेच प्रभाकरराव सोनवणे, विष्णु सेठ सोनवणे,सरपंच भगवान सेठ सोनवणे यांनी प्रमुख पाहुणे चे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष भाऊ रावसाहेब दानवे, सुधाकरराव दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजग महादसेठ डोभाळ,क्रागेस चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रमेश आव्हाड,निवृत होम डिवाय एसपी रमेश घोडके,होम डिवाय मालकर, स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट चे सचीव मोरे काका यांची उपस्थिती होती.यावेळी संभाजी नगर येथील कांता शास्त्री सागर शास्त्री यांनी शनीश्वैर भगवान ला अभिषेक केला.यावेळी सुरंगली काशी विश्वेश्वर संस्थानचे विश्वस्त माजी सरपंच डॉ.संजीव पाटील यांची उपस्थिती होती.कार्यक्रमा
सांगता काल्याच्या किर्तनाने झाली.आळदी देवाची येथील हभप संदीपान हासेगावकरयांच्या किर्तनाने करण्यात आली. 25 में रोजी हभप झोल महाराज यांचे किर्तन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर सहकारी साखर कारखाना चे संचालक प्रभाकरराव सोनवणे, विष्णु सेठ सोनवणे,निवृत होम डिवाय एसपी रमेश घोडके, हभप गजिंधर महाराज यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृष्णा वाघ यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे