बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार – भाजप नेते चेअरमन सतीश घाटगे
घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती अशक्य - शिवसेना नेते डॉ हिकमत उढाण

वडीगोद्री/तनवीर बागवान,दि.24
अंबड व घनसावंगी बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप प्रयत्न केले.परंतु या प्रयत्नांना हाणून पाडत निवडणुका लढविल्या जात आहेत.भाजप – शिवसेना पूर्ण ताकतीने ह्या निवडणुका लढवत आहेत.शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ह्या बाजार समित्या बकाल करून ठेवल्या आहेत.येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या बाजार समित्यांची चौकशी लावणार आहे.शेतकऱ्यांना योग्य मान सन्मान मिळावा.म्हणून या दोन्ही बाजार समित्या भाजप – शिवसेनेच्या ताब्यात द्याव्यात,असे आवाहन भाजप नेते सतीश घाटगे यांनी केले आहे.
अंबड तालुक्यातील तीर्थपूरी येथे घनसावंगी बाजार समितीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजप नेते सुनील आर्दड,शिवाजी शेजुळ,गणेश पवार,शिवाजी शिवतारे,उद्धव मरकड,शिवाजी बोबडे,अंकुश बोबडे,रणजित उढाण,अभिजित उढाण,भांगे नाना,विष्णुपंत जाधव, कैलाश शेळके,पुरूषोत्तम उढाण,आर. व्हि.छल्लारे,अशोक जाधव,राहुल कणके यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना नेते डॉ हिकमत उढाण म्हणाले की,महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी आहे.परंतु घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होणे अशक्य आहे.आघाडी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले गेले.पण वरीष्ठ पातळीवरील विरोध पत्करून भाजप सोबत युती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अनेक निवडणुका लढविल्या.काही निवडणुकात पराभव पण झाला.पण आता विजयी होण्यासाठी बाजार समितीची निवडणूक लढविण्यास तयार राहावे,असे ते म्हणाले.
यावेळी भाजप नेते सुनील आर्दड म्हणाले की,घनसावंगी बाजार समिती निवडणूक ही जोमाने लढवावी.यासाठी सर्व मतदारांनी भाजप व शिवसेना यांना मदत करून विजयी करावे,असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव मरकड यांनी केले.तर भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे,अंकुश बोबडे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रमेश काळे,रघुनाथ ताठे,रामेश्वर गरड,सुरेश पोटे,सुरेश उगले,एकनाथ राठोड,हरिभाऊ तांगडे,सदाशिव यादव,मोहन तांगडे,गणेश पगळ,विष्णुपंत हरबक,शिवाजी कंटुले,प्रताप कंटुले,दांडगे,फारूक दफेदार,सुभाष दांडगे,श्रीरंग वाघमारे,परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार,सर्व प्रवर्गातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.