पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च करून भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यामुळे भाजपा जालना च्या वतीने जल्लोष

जालना/प्रतिनिधी,दि.8
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरसह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदला म्हणून पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च करून भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यामुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना च्या वतीने (ता.०८) फटाके फोडून व पेढे, लाडू वाटून जल्लोष साजर करण्यात आला.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, सौ.विमलताई आगलावे,राजेश राऊत,अशोक आण्णा पांगारकर, सोपान पेंढारकर, सौ.संध्याताई देठे, चंपालाल भैय्या भगत, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, धनराज काबलिये, राजेंद्र भोसले, सुनील भैया खरे, शिवराज जाधव, अमोल कारंजेकर, अमोल धानुरे, बाबासाहेब कोलते, रवींद्र अग्रवाल, जगदीश येनगुपटला, वसंतराव शिंदे, सोमनाथ गायकवाड, आनंद झारखंडे, डोंगरसिंग साबळे, इम्रान सय्यद, सुहास मुंडे, योगेश लहाने, निवृत्ती लंके, सुदर्शन काळे, शिवाजी महाराज गवारे, सुखदेव महाराज गोरे, हरिभाऊ गोरे, नेमिनाथ बागल, विकास कदम, उमेश पेंढारकर, दत्ताभाऊ गारखेडे, भगवानराव शिंदे, संजय माधवले, गौरव गोधेकर, शाम उगले, नितीन कायंदे, तुकाराम बखळे, पवन मुंडे, राहुल जाधव, ओम कळकुंबे, महेश मुळे, अनिल यशवंते, ऋषीकेश खटके, रोहित नलावडे, दौलत भुतेकर, भगवान शिंदे, वेंकटेश गंडाळ, माणिक फड, दीपक सोनुने आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.