गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अॅग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना/प्रतिनिधी,दि. 25
ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग व वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अॅग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. सधारनताः गिग व प्लॅटर्फार्म वर्कर म्हणजे शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार आदि मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, प्रोफेशन सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडिया सर्विसेस हे सर्व प्लॅटफॉर्म गिग वर्करच्या व्याख्येत येतात. अमॅझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई श्रम eshram.gov.in वर नोंदित होवू शकतील व केंद्र सरकारकडे त्यांचा डेटा तयार होईल म्हणुन दि. 1 एप्रिल 2025 पासून सर्व गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. डिजिटल मध्यस्थी म्हणुन काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांनी अॅग्रिगेटर म्हणुन नोंदीत होणे आवश्यक असून सर्व अॅग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 रोजी पर्यंत register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.