ब्रेकिंग
21 ऑगस्ट रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे आयोजन
0
3
2
1
6
3
जालना/प्रतिनिधी,दि. 9
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीमध्ये ज्या तक्रार अर्जदारांना शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याविरुध्द भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अफरातफर, विलंब केल्याबाबत तक्रार द्यावयाची असेल त्यांनी संबंधित तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे अथवा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे सबळ पुरावे सादर करुन तक्रार करावी. असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
2
1
6
3