पो स्टे जाफ्राबाद हद्दीतील माहोरा येथे येवता पाटीजवळ 20400 रू ची विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह पकडले

विरेगाव /गणेश शिंदे दि 31
आज दि 31/05/2023 रोजी सपोनि श्री तडवी साहेब यांच्या आदेशाने पोना 1295 पायघन व पथकास माहोरा बीट हद्दी मध्ये अवैध धंदे यावर कार्यवाहीचे आदेश देऊन रवाना झालेले असताना गोपनीय माहितीचे आधारावर येवता पाटीवर इसम नामे गौस खा नवाज खा रा कठोरा बाजार हा त्याचे ताब्यात विदेशी दारू इम्पेरियल ब्लू कंपनीच्या 102 सीलबंद बाटल्यासह मिळून आल्याने त्यावर पो स्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री इंदल बहुरे, सपो नि श्री तडवी यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे जाफ्रा बाद चे पोहेका गजानन गावंडे, पोना गणेश पायघन,पो अम संदीप गवई संदीप भागीले यांनी केली आहे.