pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पळसा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शक्ती सन्मान आरोग्य शिबीर व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

0 1 6 5 1 1

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त शासनाने प्रत्येक गावात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा स्त्रि शक्ती सन्मान कार्यक्रमात गावातील दोन महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.
या निमित्ताने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रेरणादायी असलेल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन व आरोग्य शिबीराचे आयोजन पळसा येथे बुधवार एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात केले असून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीरात नांदेड येथील सुप्रसिध्द भगवती हास्पिटलच्या डॉ.शुंभागी देवसरकर, डॉ .विद्या एकलारे, डॉ.शितल कुरुंदकर, डॉ.पुजा वानखेडे यांच्या उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने गावकरी परीसराच्या वतीने नुकतेच पदोपदी झालेले तहसीलदार जिवराज डापकर, तालुका कृषी अधिकारी आर.डी.रणवीर, सेवा निवृत्त झालेले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ ढगे व बदली झालेल्या आरोग्य सेविका पांचाळ व आरोग्य सेवक बाळु काकडे यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी उदघाटक आमदार माधवराव पाटील जवळगावकर मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे माजी खासदार सुभाषराव वानखेडे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जिवराज डापकर, अभीयान जिल्हा व्यवस्थापक गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक व्दारकादास राठोड , गटविकास अधिकारी डि.के.अडेराघो, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, कृषी अधिकारी आर.डी.रणवीर, यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला पळसा सह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधवासह सह राजकीय सामाजिक क्षेत्रासह इतीहास प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समुह साधन व्यक्ती सामाजिक कार्यकर्त्या सविता विनोद निमडगे, पळसा संरपंच शिल्पा रणजीत कांबळे उपसरपंच संजय भाऊ काला ग्रामपंचायत कार्यालय व समस्त गावकरी मंडळी पळसा च्या वतीने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे